कामठीत दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून

Murder of a youth crushed by a stone in Kampthi
Murder of a youth crushed by a stone in Kampthi

कामठी (जि. नागपूर) : नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत कन्हान नदीच्या काठावरील बाबू हरदास एल. एन. यांच्या समाधीस्थळावर एका अनोळखी युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना आज शुक्रवार (ता.5) सकाळी उघडकीस आली. मृताची अद्याप ओळख पटली नाही. पोलिसांना मृतासह आरोपीचा शोध घेणे आव्हान ठरत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलिस ठाण्याअंतर्गत कन्हान नदीच्या तीरावरील बाबू हरदास एल. एन. यांच्या समाधीस्थळावर एका अनोळखी युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवक 25 ते 30 वर्षे वयोगटातील आहे. त्याच्या डोक्‍यावर दगडाचा जबर मार आहे. आज शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून याबाबत सूचना दिली.

नवीन कामठी पोलिसांना सूचना मिळाल्यानंतर दुय्यम पोलिस निरीक्षक राधे पाल ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. एसीपी भालचंद्र मुंढे, डीसीपी निलोत्पल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्‍वानपथकातील कर्मचाऱ्यांनी श्‍वानाला मृतदेह असलेल्या ठिकाणी नेण्यात येऊन आरोपीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, श्‍वान समाधीस्थळाच्या मागील बाजूस काही अंतरापर्यंत जाऊन परत आल्याने पोलिसांना सुगावा मिळू शकला नाही. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


कन्हान नदीच्या काठावर मोकळ्या जागेत एकाच छताखाली एकीकडे जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल एन व दुसरीकडे बिडी कामगारांचे नेते ऍड. दादासाहेब कुंभारे यांची आठवण म्हणून समाधीस्थळ बांधण्यात आले आहे. ज्या बाजूला बाबू हरदास एल एन यांचे समाधी स्थळ आहे या स्थळावर एका अनोळखी व्यक्‍तीचा खून करण्यात आला. मृताच्या डोक्‍यावर दगडाचा जबर मार असून, ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप करण्यात आला. सकाळी एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती दिली. कंट्रोल रूमद्वारे नवीन कामठी पोलिसांना सूचना दिल्यानंतर दुय्यम पोलिस निरीक्षक राधे पाल ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

एसीपी भालचंद्र मुंढे, डीसीपी निलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काही वेळातच नागपूर येथून "राणी' नावाच्या श्वानाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाला मृतदेहापासून प्रेत असलेल्या ठिकाणापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु श्‍वानाला काही सुगावा लागला नाही. नवीन कामठीचे पोलिस प्रत्येक पोलिस ठाण्यात मिसिंग असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून मृत नेमका आहे तरी कोण? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.


मागील वर्षी जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील खैरी शिवारातील हॉटेल नोव्हाटेलच्या मागील व याकूब शाह दर्ग्याजवळ एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह पडीत विहिरीत फेकल्याची घटना 14 जुलै रोजी उघडकीस आली होती.

मात्र, यातील मृताची ओळख पटविणे व आरोपीचा शोध लावणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते तर महिना लोटूनही या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसाना यश प्राप्त न झाल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा विभाग युनिटला दिले असता अवघ्या चार दिवसात या खून प्रकरणाचे गूढ रहस्य उलगडण्यासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com