Nagapur : माजी आमदाराला मिळालेले सन्मान, पुरस्कार भंगारात

सोले यांच्या समर्थकांच्या कानावर ही वार्ता पोहचताच त्यांनी भंगार दुकानात धाव घेतली
awards
awards sakal

नागपूर : माजी महापौर, आमदार तसेच शिक्षक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल सोले यांना विविध संघटना, विद्यापीठांनी दिलेले सन्मानचिन्ह आणि पुरस्काराचा कचरा झाला असून ते रामदासपेठेतील एका फुटपाथ वरील भंगाराच्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आले असल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

सोले यांच्या समर्थकांच्या कानावर ही वार्ता पोहचताच त्यांनी भंगार दुकानात धाव घेतली. सर्व सन्माचिन्ह, स्मृतिचिन्ह तसेच भेटस्वरुपात प्राप्त झालेल्या सर्व वस्तू परत नेल्या. तत्पूर्वी यातील काही आकर्षक स्मृतिचिन्ह दुकानदाराने ५० ते १०० रुपयांमध्ये ग्राहकांना विकून टाकली होती. त्यामुळे सन्मानाचा कचरा केल्याचे बोलले जात आहे.

अनिल सोले हे नागपूर विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. कित्येक संस्थांनी सत्कार केल्यानंतर पुरस्कार अथवा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. त्या मिळालेल्या पुरस्कार अथवा सन्‍मानामध्ये गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या सन्मान चिन्हासह आमदार बंटी भांगडीया यांनी आयोजित केलेल्या शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्‍मान चिन्ह, लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ रेशीमबागेने दिलेले भारत मातेचे छायाचित्राचे स्मृती चिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणापुंज सन्मान, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्हही रामदास पेठ येथील फुटपाथवर भंगारात पडलेले होते.

अन् पुरस्कार, सन्मानांची कार्यालयात पाठवणी

सोले यांना मिळालेले पुरस्कार रामदासपेठ येथील फुटपाथवरील भंगाराच्या दुकानात असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक विजय फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयात मिळाली. त्यांनी लगेच रामदासपेठ येथील भंगार विक्रेत्यांकडे धाव घेतली. सरांचे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हे पुरस्कार एका पोत्यात भरून ठेवलेले होते. कर्मचाऱ्यांना रद्दी आणि भंगार विकण्यास सांगितले होते. त्यांनी रद्दी समजून पुरस्काराने भरलेले पोतेच येथे आणले असावे अशी शंका व्यक्त केली. आम्ही नवीन कार्यालयात पुरस्कार ठेवण्यासाठी ते पोते शोधत होतो. तेव्हा हे पुरस्कार भंगार विक्रेत्याकडे असल्याची माहिती मिळाली. तातडीने येथे पोहचलो आणि सर्वच पुरस्कार परत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com