esakal | नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूरसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नगरखेड पंचायत समितीत भाजपने बाजी मारली आहे.

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. याआधी नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ती भाजपने हिसकावली आहे.

हेही वाचा: Live : नागपुरात भाजपला मोठा धक्का, १० मिनिटात निकाल बदलला

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार तर, पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात उतरले होते. उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण या निवडणुकीतील निकालावरच विधान परिषद निवडणुकीतील विजय-पराभवाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती.

loading image
go to top