

नागपूर : रेशन दुकानातून जुलै महिन्यापासून प्रती एक किलो अतिरिक्त तांदूळ मिळणार असून, गव्हाचा कोटा एक किलोने कमी करण्यात आला आहे. कोविड काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना शासनाने रेशन दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले.
शिधापत्रिकाधारकांना डिसेंबरपर्यंत रेशनमधून मोफत धान्याचे वितरण होणार आहे. शहरात ३ लाख ९६ हजारांवर शिधापत्रिकाधारक असून, त्याअंतर्गत १५ लाखांवर लाभार्थी आहेत. तर ग्रामीणमध्ये ४ लाख २१ हजार शिधापत्रिकाधारक असून, १७ लाखांवर लाभार्थीसंख्या आहे.
या सर्व शिधापत्रिकांमध्ये प्राधान्य गट, बीपीएल आदींचा समावेश आहे. या सर्व शिधापत्रिकाधारकांना शहरातील ६५० व ग्रामीणमधील सुमारे ६४५ स्वस्त धान्य दुकानातूनातून धान्याचे वितरण होते.
त्यानुसार प्रती शिधापत्रिकाधारकांना प्रती लाभार्थी गहू व तांदूळ मिळून ५ किलो धान्याचे वितरण करण्यात येते. यामध्ये २ किलो गहू व ३ किलो तांदळाचा आजवर समावेश होता. परंतु आता जुलै महिन्यापासून वितरणात शासनाकडून काही बदल करण्यात आले आहे.
त्यानुसार प्रती लाभार्थी हे ५ किलोच धान्य वितरित होणार आहे. परंतु यामध्ये आता २ किलो गव्हाऐवजी १ किलोच गहू मिळणार आहे. तर ३ किलोऐवजी लाभार्थ्यांना ४ किलो तांदूळ मिळेल.
शिधापत्रिकाधारकांना २ किलो गहू व ३ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत होते. परंतु जुलै महिन्यापासून या वितरण प्रणालीत बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या वितरण प्रणालीनुसार आता शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती पूर्वीप्रमाणेच ५ किलो धान्य वितरित होईल. परंतु यामध्ये १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ असे वितरण होणार आहे.
- भास्कर तायडे, शहर अन्न धान्य पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.