नागपूर : गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे?

शिक्षणावरही वाढत्या महागाईचा भार, शैक्षणिक साहित्य दरात १० ते २० टक्के वाढ
Nagpur 10 to 20 percent increase inflation in educational materials
Nagpur 10 to 20 percent increase inflation in educational materialssakal
Updated on

जलालखेडा : नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर आले आहे. त्यामुळे आठवडाभरात विविध शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शैक्षणिक साहित्यात १२ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने तसेच वाढत्या महागाईमुळे पालकांचे बजेट बिघडल्यागत झाले असून, त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

२०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षात कोरोना संक्रमण आणि लॉकडाउन यामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने, तसेच मुले शाळेत न गेल्याने पालकांना फारसे शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागले नाही. शिवाय, या दोन्ही वर्षात शैक्षणिक साहित्याचे दर आजच्या दराच्या तुलनेत कमी होते. जानेवारी २०२२ पासून शाळा व महाविद्यालये पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. हीच परिस्थिती आगामी शैक्षणिक सत्रात राहणार असल्याने पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी स्कूल बॅगपासून तर पुस्तके, वह्या, पेन, वॉटर बॉटलपर्यंत बहुतांश साहित्य नव्यावे खरेदी करावे लागणार आहे.

कोरोना संक्रमण कमी होताच दैनंदिन वापरासह इतर वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून, तुलनेत आर्थिक उत्पन्न आधीएवढेच राहिले आहे. त्यामुळे बचत करणे शक्य होत नसून, वाढलेले शैक्षणिक साहित्यांचे दर आवाक्याबाहेर वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.

वह्यांची किंमत ५० ते ८० रुपये प्रति डझन

मागील वर्षी १०० पेजेसच्या वह्यांचे दर प्रति डझन २२० रुपये होते, तर ते यावर्षी ३०० रुपये, २०० पेजेस वह्यांचे दर प्रति डझन ३५० रुपयांवरून ४०० रुपये प्रति इझन झाले आहेत. मागील वर्षी १० नग पेनांसाठी ३५ रुपये द्यावे लागायचे. यावर्षी १० रुपये अधिक म्हणजेच ४५ रुपये जास्तीचे द्यावे लागत आहे. सोबतच स्कूलबॅग, वॉटर बॉटल, शूज व इतर साहित्याचे दर किमान २० टक्क्यांनी वाढले आहेत.

वाहतूक खर्च वाढला

मागील वर्षी शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी (गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) १२ टक्क्यांवरून १६ टक्के करण्यात आला आहे. त्यातच कागदाचे दर वाढले असून, पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. सोबतच मजुरी, हमाली व इतर खर्च वाढल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत, अशी माहिती शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांसह काही जाणकार व्यक्तींनी दिली.

प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ होत आहे. उत्पन्न मात्र पूर्वी एवढेच आहे. उत्पन्नाचे नवीन साधनही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अधिक पैसा मोजावा लागणार आहे.

-जगदीश बारमासे, पालक, जलालखेडा

कच्च्या मालापासून तर जीएसटी आणि वाहतूक भाड्यात वाढ झाल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत. वह्यांचे दर १५ ते २० टक्के, पेन दोन ते चार रुपये आणि स्कूल बॅगचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

-अतुल चरपे, शैक्षणिक साहित्य विक्रेता, जलालखेडा

yogesh tripathi मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. या दरवाढीमुळे खर्चाचे वार्षिक नियोजन बिघडले आहे.

-योगेश त्रिपाठी, पालक, जलालखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com