नागपूर : ताजबागमध्ये ५०० बेडचे हॉस्पिटल

नितीन गडकरी : अतिक्रमण हटवण्यासह उर्सच्या कामांना गती देण्याचे निर्देश
Nagpur 500 bed hospital in Taj Bagh
Nagpur 500 bed hospital in Taj Bagh

नागपूर - ताजुद्दीन बाबा दर्गा परिसराच्या विकासकामांना गती द्या. तसेच पक्के आणि मजबूत बांधकाम करा म्हणजे ते दीर्घकाळ टिकेल. या परिसरात गरिबांसाठी ताजुद्दीन बाबांच्या नावाने ५०० रुग्णशय्येचे हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.

ताजबाबा दर्गा सौंदर्यीकरण, विकासकामांबाबत तसेच आगामी काळात ताजबाबा ऊर्स उत्सवाबाबत आढावा बैठक गडकरी यांनी घेतली. बैठकीला आमदार प्रवीण दटके, आ. मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, नासुप्र सभापती मनोज सूर्यवंशी ताजबाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारेखान व अन्य विश्‍वस्त उपस्थित होते.

बैठकीत नासुप्र सभापती सूर्यवंशी यांनी सांगितले की, आतापर्यंत या कामासाठी ११८ कोटी प्राप्त झाले आणि ११५ कोटींची कामे झाली आहेत. छोट्या दर्गाच्या सौंदर्यीकरणाचे कामही सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणाऱ्या गुंडांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टचा कारभार आज ४ कोटींनी नफ्यात असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

ताजबाग विश्‍वस्त मंडळाने या परिसराच्या निगराणीसाठी पोलिसांसोबत बसून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशा सूचनाही गडकरी यांनी केल्या. तसेच नासुप्र-महापालिका-पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करून ताजबाग विश्‍वस्त मंडळाच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी. कारवाईच्या वेळी ताजबाग विश्‍वस्तांनीही उपस्थित राहावे. अतिक्रमण काढल्यानंतर ट्रस्टने संपूर्ण परिसराला संरक्षक भिंतही उभारावी. पार्किंगच्या जागाही निश्चित करा, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या.

यंदा उर्सला १० ते १५ लाख भाविक येणार

दोन वर्षांनंतर हा उत्सव साजरा होत असल्यामुळे सुमारे १० ते १५ लाख भाविक उर्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com