Union Minister Nitin Gadkari addresses a workshop on animal husbandry and fodder planning at Agrovision 2026 in Nagpur.
esakal
नागपूर,: विदर्भ आणि मराठवाड्याने दुग्ध संकलनाचा १० लाख लिटरचा टप्पा गाठला आहे. पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या वतीने ५०० टन पशुखाद्य निर्मितीचा प्रकल्प लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. ८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून दुग्ध पदार्थ बनवण्याचा कारखानाही उभारण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.