Akola News:५७ शेतकरी मृत्यू प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात, मंजुरीची बघावी लागतेय वाट; जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीकडे लक्ष

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा घटना जिल्ह्यात नेहमीच होत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
Akola News
Akola NewsEsakal

Akola Agriculture News: नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा घटना जिल्ह्यात नेहमीच होत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे वास्तव आहे.

दरम्यान प्रशासकीय स्तरावर सुद्धा शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांना मंजुरीची वाट पाहावी लागत आहे. आत्महत्या प्रकरणांना मंजुरी देणाऱ्या समितीची बैठक अद्याप न झाल्याने ५७ शेतकरी प्रकरणांना मंजुरी प्रतीक्षा आले. असे असले तरी लवकरच होणाऱ्या समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी याेजना शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आठवड्यात तीन-चार दिवसाआड सरासरी एक शेतकरी आत्महत्या हाेत असल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत. (Latest marathi News)

२०१५ मध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आकडा दाेनशेजवळ पाेहचला हाेता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे चांगले उत्पादन हाेत आहे. परंतु त्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना सुरूच आहेत. शेतकरी आत्महत्याच्या घटना बघून शेती व शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.

Akola News
MP Pragya Singh : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ; खासदार प्रज्ञा सिंह यांना सुनावणील हजर राहण्याचे निर्देश

तालुकास्तराव सर्वाधिक प्रकरण प्रलंबित
शेतकरी आत्महत्येची प्रकरण शासकीय मदतीसाठी पात्र ठरावित यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्यात बैठक घेण्यात येते. त्यासाठीचे प्रकरण तहसिल स्तरावरून पाठवण्यात येतात. परंतु तालुका स्तरावरच ३९ प्रकरण प्रलंबित आहेत, तर १८ प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. तालुकास्तराव मोठ्या प्रमाणात प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शासकीय यंत्रणा शेतकरी आत्महत्येच्या विषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते. (Latest marathi News)

गत वर्षी १५७ शेतकरी आत्महत्या
जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये जिल्ह्यात १५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यात अकोला तालुक्यात २७, बार्शीटाकळीत १९, अकोटमध्ये २७, तेल्हारामध्ये २०, बाळापूर २०, पातूर व मूर्तिजापूरमध्ये प्रत्येकी २२ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी शासकीय मदतीसाठी ९२ पात्र, तर ३९ अपात्र ठरल्या, तर २६ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले होते.

मंजुरीसाठी प्रलंबित प्रकरण
तालुका प्रकरण संख्या
अकोला ०९
बार्शीटाकळी ०८
अकोट ०५
तेल्हारा ०९
बाळापूर १४
पातूर ०७
मूर्तिजापूर ०५
------------------------
एकूण ५७
------------------------

Akola News
Eknath Shinde on Manoj Jarange: जरांगेंच्या मागण्या कशा बदलत गेल्या अन् शेवटी...; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सगळंच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com