Nagpur : शुद्ध पाण्यासाठी ‘आप’चे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water demand

Nagpur : शुद्ध पाण्यासाठी ‘आप’चे निवेदन

वानाडोंगरी : वानाडोंगरी नगर परिषदेंर्तगत प्रभाग क्र.७ मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी असून या टाकीचे पाणी प्रभाग क्र.६, ७ व ८ मधील रहिवाशांना पुरविण्यात येते. या टाकीची ऊंची कमी असल्यामुळे कोणतीही व्यक्ती, मोकाट जनावरे टाकीवर चढतात. परिणामी कचरा, घाण टाकीमध्ये जातो. टाकीच्या आजूबाजूला डुकरांची रेलचेल नागरिकांना बघायला मिळते. अस्वछ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

हेही वाचा: Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

समस्येवर तोड़गा काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीला फ़िल्टर प्लांट संयंत्र व टाकीला सुरक्षा भिंत करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टी वानाडोंगरीकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे वानाडोंगरी येथील पदाधिकारी अतुल डाखले, मुकेश गौतम, रितिक बोदिले, ऋषिकेश मुळे, शुभम धोटे, पिंटू मते, प्रा.भास्कर रासेकर व हेमंत शेगेकर उपस्थित होते.