Accident : नागपूरकरांचा रस्त्यांवर मृत्यूशी खेळ! जीवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा

शहरात रस्ते झाले असले तरी खोदकामांनी नागरिकांची गैरसोय होत आहे.
nagpur
nagpursakal

नागपूर - बाईकधारकांची रस्त्यांवर सर्रास वेगवान सर्कस, वाहने चालविताना मोबाईलवर संवाद आणि सिग्नल नियमांचे उल्लंघन करीत नागपूरकर दररोज रस्‍त्यांवर मृत्यूशी खेळ करीत आहे. एकीकडे खोदकामामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनधारकांवर कायम अपघाताची टांगती तलवार असून त्यात वाहतूक नियमही बासनात बांधून ठेवल्याने उपराजधानी आता ‘अपघातांचे शहर’ म्हणूनही पुढे येत आहे.

शहरात रस्ते झाले असले तरी खोदकामांनी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल न पाळणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसून केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याने वाहनधारकांचीही मग्रुरी वाढली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना आरटीओने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार २०१९ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत ६ हजार ५५७ वाहनधारकांनी सिग्नल ‘जंप’ केले.

जीवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा,वेगाने वाहने चालविणाऱ्या तरुणाईचीही मोठी संख्या आहे. ८४९ तरुणांवर वेगवान वाहने चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचा वाहनचालक परवानाही रद्द करण्यात आला.

nagpur
Nagpur Fire News : महात्मा फुले मार्केटला मध्यरात्री भीषण आग

अलीकडे वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे ‘फॅशन’ झाली आहे. अनेकांच्या जीवावर बेतल्याचे अनेक उदाहरणे पुढे असूनही तरुणाई दुचाकी चालवितानाही मोबाईलवर बोलताना दिसून येते. गेल्या पाच वर्षांत ६ हजार ६५९ नागरिकांना मोबाईलवर बोलताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही अधिकृत आकडेवारी असून ही संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात सिमेंट रस्ते मोठ्या प्रमाणात तयार झाले असून सुरक्षित वाहतूक व हेल्मेट आवश्यक झाले आहे. एखादा वाहनधारक सिमेंट रस्त्यावर डोक्यावर पडल्यास मृत्यू निश्चित, असे असतानाही हेल्मेट न वापरणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. २०२२ व सप्टेंबर २०२३, या पावणेदोन वर्षात ९ हजार २१४ नागरिकांवर हेल्मेंट न घातल्याने कारवाई करण्यात आली. वाहतूक नियम पाळण्याबाबत दररोज विविध चौकांमधून जनजागृती केली जात आहे. परंतु नागरिकांची रस्त्यांवर ‘सर्कस’ कमी होत नसल्याने अनेकांचा जीव जात असल्याने चिंतेत भर पडली आहे.

nagpur
Nagpur Fire News : महात्मा फुले मार्केटला मध्यरात्री भीषण आग

हेल्मेट न घातलेल्या ९ हजारांवर नागरिकांवर कारवाई

गेल्या पावणे दोन वर्षांत हेल्मेट न घातलेल्या ९ हजार २१४ नागरिकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. हेल्मेट न घातल्याने अपघात होऊन मृत्यूची संख्या दररोज वाचण्यात येत असतानाही नागरिक स्वतः तसेच कुटुंबाबाबतही गंभीर नसल्याचे चित्र आहे.

वर्षनिहाय वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या

वर्ष सिग्नल जंप वेगाने वाहने चालविणे मोबाईलवर बोलणे

२०१९ ४४४ ७१ २४३

२०२० १६७३ २३४ २८८३

२०२१ २४८९ ३९७ ३१४५

२०२२ १७७४ १२६ ३८८

२०२३ १७७ २१ ----

(२०२३ मधील आकडेवारी सप्टेंबरपर्यंतची आहे.)

nagpur
Nagpur : चाकूच्या धाकावर ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटले; नागपूर - आमडी मार्गादरम्यानची घटना

सात महिन्यांत २३० मृत्यू

रस्ते अपघातात मृत्यूची संख्याही चिंताजनक आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत नागपुरात ४८९ अपघात झाले असून २८३ जणांना जीव गमवावा लागला. ५९८ जण जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात, त्यात होणारे मृत्यूची आकडेवारी नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचत असली तरी वाहतूक नियम बासनात बांधून ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. अपघात मुक्त शहरासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. अपघातात केवळ एकाच व्यक्ती प्रभावित होत नाही तर अनेकदा कुटुंब उध्वस्त होते. त्यामुळे वाहने चालविताना वेगावर नियंत्रण व मोबाईलवर बोलणे टाळावे.

- राजू वाघ, अध्यक्ष, रोडमार्क फाऊंडेशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com