नागपूर : जनावरे विकणाऱ्यांवर फौजदारी

पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय
Nagpur action against livestock sellers
Nagpur action against livestock sellerssakal

नागपूर : खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ९० अनुदानावर दुधाळू जनावर देण्यात आले. परंतु अनेकांनी त्याची विक्री केल्याच्या तक्रारी येत आहे. लाभाची जनावरे विकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सभापती तापेश्वर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठप पार पडली. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या ३५ कोटींच्या निधीतून पात्र लाभार्थ्यांना दुधाळू जनावरांचे दहा टक्के लाभार्थी हिस्स्यावर वाटप करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून योजनेतून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाई, शेळी व तलंगगटाचा लाभ घेतल्यानंतर काही लाभार्थ्यांनी हे गोधन दामदुप्पट भावाने विकले. या गोधनाचा फायदा स्वत:च्या उदारनिर्वाहासाठी व शेतीला जोडधंदा म्हणून व्हावा, असा उद्देश आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी परस्पर विल्हेवाट लावली.

काहींनी तर लाभ मिळाल्यानंतर जनावरे घरीसुद्धा नेली नाही. वाटेतूनच सौदा करण्यात आला. याविषयीच्या तक्रारी पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त होत्या. ही बाब शासनाची शुद्ध फसवणूक व गैरप्रकाराला चालना देणारी असल्याचा निष्कर्ष बैठकीतून पुढे करण्यात आला. अशा लाभार्थ्यांच्या थेट घरी जाऊन पंचनामा पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांकडून होईल. त्यांच्या अहवालाच्या आधारे लाभार्थ्यांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले. २५ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

लाभार्थ्यांकडून पशुधन विक्री केल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात अशा प्रकारावर आळा घालता येईल.

-तापेश्वर वैद्य, सभापती, पशुसंवर्धन समिती,जि. प.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com