नागपूर : सदस्यांच्या प्रश्‍नावरील कारवाईला ठेंगा

सदस्यांचा रोष : सिनेट बैठकीत गोलमोल उत्तरे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठsakal

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट बैठकीच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाच्या कामाकाजावर सदस्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यावेळी फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या बैठकीतील कारवाईचा कृती अहवाल आणि मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. केवळ उत्तरात ‘कारवाई सुरू आहे’ असे सांगत सदस्यांच्या प्रश्‍नांना ठेंगा दाखविण्यात आल्याची प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीच्या कार्यवृत्तावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्याचा कृती अहवाल सादर करण्यात आला. मात्र, या अहवालात सदस्यांच्या प्रश्‍नावर कारवाई सुरू आहे, असा शेरा देण्यात आला होता. या शेऱ्यावर सदस्यांनी नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत प्रशासनाकडे विचारणा करीत, त्या सदस्याला ती माहिती का देण्यात आलेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
नागपूर : आंतरराष्ट्रीय कॉलने खंडणीच्या धमक्या

मात्र, त्यावर थातूरमातूर उत्तरे देत, प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यात प्रामुख्याने सिनेट सदस्य डॉ. अजित जाचक, प्रा. प्रशांत डेकाटे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर प्रशासनाकडून नेमकी उत्तरे येत नसल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी सदस्यांना कारवाईचे पत्र का मिळत नाही, यावर डॉ. जाचक यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यावर यापुढे ते नियमित मिळेल हे मान्य केले. केवळ कार्यपालन कृती अहवालावरच चार तास चर्चा करण्यात आली. त्यात प्रशासनाद्वारे समर्पक उत्तरे न मिळाल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला.

प्रस्तावावर सदस्यांमध्ये खडाजंगी

सदस्यांच्या प्रस्तावावर प्राधिकरणाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयावर सदस्यांनी आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली. यात डॉ. अजित जाचक यांच्या ग्रंथपाल, उपग्रंथपाल, शारीरिक शिक्षण विभागातील अध्यापनाच्या अनुभवाच्या आधारे पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यतेचा प्रस्ताव टाकण्यात आला होता. मात्र, त्याला विद्वत परिषदेद्वारे अमान्य करण्यात आले. ही बाब विद्वत परिषदेने अमान्य केल्याने त्यावर डॉ. जाचक यांनी आक्षेप घेतला. मात्र, डॉ. आर. जी. भोयर यांनी त्यावर आक्षेप घेतला. याशिवाय असा आक्षेप घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. यात डॉ. बबनराव तायवाडे आणि डॉ. नितीन कोंगरे यांनी उडी घेतल्याने सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. मात्र, त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव सुधारणेसह स्वीकारण्याचे मान्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com