Nagpur News : तलावात बुडण्यापासून वाचविणार रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्ट; बुडणाऱ्याला वेगाने मदत पोहोचविणे होणार शक्य
Watercraft Rescue : पावसाळ्यात तलाव आणि धरणांमध्ये होणाऱ्या बुडण्याच्या घटनांवर उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाने रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्ट खरेदी केले आहेत. हे उपकरण बुडणाऱ्या व्यक्तीला तातडीने मदत पोहोचवेल.
नागपूर : जिल्ह्यातील विविध तलाव व धरणे पावसाळ्यात पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मात्र, याच ठिकाणी नागरिकांकडून होणाऱ्या धाडसी कृतीमुळे दुर्घटनांची शक्यता वाढते आणि दरवर्षी अनेक दुर्दैवी घटना घडतात.