

Firecracker smoke contributed to a decline in air quality across several areas of Nagpur after Diwali Panchami celebrations.
esakal
नागपूर, : दिवाळीनंतरच्या पंचमीनिमित्त शनिवारी रात्री झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला. शहरातील अनेक भागांत प्रदूषणाची पातळी वाढली असून, रामनगरमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०५ वर पोहोचला. महालमध्येही सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर गेल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.