Nagpur News: नागपुरातील हवा प्रदूषित

गुणवत्ता निर्देशांकाची ३०० पर्यंत उडी
 Air pollution in Nagpur, Nagpur News
Air pollution in Nagpur, Nagpur Newssakal

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून राजकीय हवा गरम झालेली आहे. त्यात भर म्हणून नागपुरातील हवाही प्रदूषित होत असल्याचे दिसत आहे. गेल्या १९ दिवसांची आकडेवारी पाहता हवा गुणवत्ता निर्देशांकात वाढ होत आहे. या काळात शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा १५० ते ३०० पेक्षा अधिक असल्याचे आढळले. शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरात सर्वाधिक हिरवळ असताना याच परिसरात ही नोंद झाली आहे. (Nagpur News)

हिवाळी अधिवेशनामुळे शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच कारखाने १०० टक्के सुरु असल्याने सतत प्रदूषणात वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यातच शहराच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने अभ्यासकांना चकित केले होते. या महिन्यात तब्बल २४ दिवस शहर प्रदूषित होते. त्यातील १२ दिवस शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५० तर उर्वरित १२ दिवस तो २००पेक्षा अधिक होता. बाकी चार दिवसही तो समाधानकारक श्रेणीत नव्हता.

नागपुरातील हवा प्रदूषित

डिसेंबर महिन्याच्या सलग पाच दिवस शहरातील हवेचा निर्देशांक अति प्रदूषित होते. तर ६सलग आठ दिवस हवेची गुणवत्ता प्रदूषित होती. तर आठ दिवस शहरातील हवा साधारण प्रदूषित होती. रविवारी १८ डिसेंबरला मात्र, शहरातील हवा उत्तम असल्याचे पुढे आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्येच शहराची स्थिती वाईट असताना डिसेंबरमध्ये परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातच हवा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या वर गेला होता. त्यामुळे शहराच्या इतर भागाची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावता येतो. तो ३००च्या वर असणे म्हणजे श्वास घेण्यास धोकादायक आहे.

अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अधिक

गेल्या काही वर्षात शहरातील हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पीएम २.५) अधिक आहे. हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास हवेची गुणवत्ता खराब होते. थंडी वाढल्यावर रस्त्यावर राहणारे लोक शेकोटीचा आधार घेतात. त्यामुळेही हवा प्रदूषणात वाढ होते. कारण हिवाळ्यात हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण हवेत सहज विखुरले जात नाहीत. ते एकाच ठिकाणी गोळा होतात. त्यामुळेही प्रदूषणाचा स्तर वाढलेला दिसून येतो असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com