

Temporary traffic and passenger pickup arrangements announced at Dr. Babasaheb Ambedkar International Airport in Nagpur.
esakal
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेंट्रल डोमच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्था, प्रवासी पिक-अप आणि पार्किंगच्या प्रवेश-निर्गमन मार्गात तात्पुरते बदल करण्यात येत आहे. हे बदल सोमवार (ता.१६) पासून लागू होणार आहेत. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या आणि प्रवाशांना घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी नव्या वाहतूक व्यवस्थेची नोंद घेण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.