Nagpur Traffic :अजनी चौकातील 'ट्रॅफिक जॅम'चा भूलभूलय्या; ‘स्मार्ट सिटी’ ठरू लागली डोकेदुखी, अपघातांची भीती

नागपूरचे प्रवेशद्वार व दक्षिण नागपुरातील महत्त्वाच्या या चौकात वर्धा रोड, देवनगर, मेडिकल चौक, जनता चौक व जेरील लॉन लक्ष्मीनगरकडून दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येतात.
Nagpur Traffic
Nagpur TrafficSakal
Updated on

Nagpur News : उपराजधानीची 'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. मात्र आता हा विकास नागपूरकरांची डोकेदुखी ठरू लागला आहे. याचे उत्तम उदाहरण अजनी चौक परिसर म्हणता येईल. चहू बाजूंनी वर्दळ असलेल्या या चौकात बाराही महिने वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

नागपूरचे प्रवेशद्वार व दक्षिण नागपुरातील महत्त्वाच्या या चौकात वर्धा रोड, देवनगर, मेडिकल चौक, जनता चौक व जेरील लॉन लक्ष्मीनगरकडून दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेषतः सकाळ व सायंकाळी हे चित्र पाहायला मिळते.

परिणामतः पेट्रोलची तर नासाडी होतेच, शिवाय वाहतुकीचीही प्रचंड कोंडी होते. वाहनधारक घाईघाईने कुठूनही अडवी-तिडवी वाहने टाकत असल्यामुळे सारखी अपघातांची भीती वाटते. उल्लेखनीय म्हणजे, या चौकात सिग्नल तर आहे, पण वाहतूक पोलिस तैनात राहात नाही.

त्यामुळे सर्वत्र गोंधळाची परिस्थिती दिसून येते. कुणी अडवणारे किंवा रोखणारे नसल्याने वाहनधारक सर्रास नियमभंग करून स्वतःसह दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकत आहेत. वाहतूक कोंडीमुळे ऑफिसला जातानाही नागरिकांना नेहमीच उशीर होतो.

त्यामुळे प्रशासनाने येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा तसेच चौकात वाहतूक पोलिसांची नियमित ड्युटी लावावी, व हा प्रश्‍न कायमचा निकाली काढावा अशी मागणी शहरातील नागरिकांद्वारे केली जात आहे.

ॲम्ब्युलन्सलाही बसतो फटका

परगावावरून गंभीर रुग्णांना घेऊन अनेक रुग्णवाहिका या चौकातून शहरात दररोज येतात. त्यांनाही ''ट्राफिक जॅम''चा फटका बसतो. बऱ्याचवेळा रुग्णवाहिका अडकून पडते. आणीबाणीच्या स्थितीतही त्यांना वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडता येत नाही. रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्यास रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यालयात जाण्याचा हा माझा नेहमीचा मार्ग आहे. मात्र येताना आणि जातानाही येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे सारखी अपघाताची व जीवाची भीती, धाकधूक असते. येथील ''ट्राफिक जॅम'' ची डोकेदुखी कमी व्हावी, एवढीच एक अपेक्षा आहे.

-प्रशांत काळे, वाहनधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com