Amit Shah Nagpur Visit | अमित शहा यांच्यासाठी आज म्‍युझिकल फाउंटेनचा ट्रायल शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Amit Shah Nagpur Visit

Nagpur News: अमित शहा यांच्यासाठी आज म्‍युझिकल फाउंटेनचा ट्रायल शो

Amit Shah Nagpur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी शुक्रवारी (ता.१७) फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेन आणि लाईटचा विशेष ट्रायल शो आयोजित केला आहे.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍या वतीने आयोजित या ट्रायल शोला गृहमंत्री अमित शहा विशेष अतिथी म्‍हणून उपस्थित राहतील. सायंकाळी साडेसात वाजता शोला प्रारंभ होईल.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित राहतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्‍या या फाउंटेन शोला संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभले असून,

अमिताभ बच्‍चन, गीतकार-गुलजार व अभिनेते नाना पाटेकर यांची कॉमेंट्री आहे. ट्रायल शोच्‍या पासेस नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकरनगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ, खामला, नागपूर येथून सकाळी १२ वाजेपासून प्राप्‍त करता येतील.