नागपूर : आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस

आठ दिवसांच्या आत उत्तर दिले नाहीतर ऐकततर्फी कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे.
माजी आमदार डॉ आशिष देशमुख
माजी आमदार डॉ आशिष देशमुखsakal

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांना पक्षाने कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यावर आठ दिवसांच्या आत उत्तर दिले नाहीतर ऐकततर्फी कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजप च्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. भाजप उमेदवार पर्वता कलबांडे यांच्या सोबत देशमुख प्रचार करीत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

त्यांना निलंबित करण्याचा ठराव कॉग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आला होता. मात्र या आरोपांवर देशमुख यांनी आजवर प्रतिक्रिया दिली नाही. देशमुख यांना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी करणे दाखवा नोटिस बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com