

Nagpur ATC Record
sakal
नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाने हवाई वाहतूक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) २०२४ या वर्षात तब्बल ५ लाख ८५ हजार ५०५ विमानांच्या हालचालींचे यशस्वी नियंत्रण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. दररोज सरासरी १,५५४ विमानांचे संचालन नागपूर एटीसीच्या देखरेखीत होत आहे.