Nagpur News : लेखकांच्या मताला महत्त्व नाही - महेश एलकुंचवार

विदर्भ साहित्य संघातर्फे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ.
Dr. Ravindra Shobhane
Dr. Ravindra Shobhanesakal

नागपूर - मराठी साहित्य संमेलन हा एक मोठा उत्सव असतो. मात्र, मी माणसात वावरणारा नसल्याने मी कधी संमेलनांना गेलो नाही. अशा संमेलनावर दोन-तीन कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात तीन महत्त्वांच्या लेखकांसह संमेलनाचे आयोजन व्हायला हवे. यामुळे, संमेलनाचे स्वरूप मोठे होईल अन् ते प्रत्येकापर्यंत पोचेल. अर्थात हे सगळ केवळ मला वाटून चालणार नाही. कारण, लेखकाचे मत या देशात कमी महत्त्वाचे होत चालले आहे, असे मत ख्यातनाम नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघातर्फे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी भूषविले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, वि. सा संघाचे सरचिटणीस विलास मानेकर उपस्थित होते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन डॉ. शोभणे यांचा पत्नी अरुणा शोभणे यांच्यासह सत्कार करण्यात आला.

मराठी शाळेसाठी नियोजित अध्यक्ष काम करीत असल्यास मी त्यांना साथ देणार असल्याचे प्रा. एलकुंचवार म्हणाले. आज महापालिकांच्या शाळा म्हणजे दारूचे अड्डे झाले आहे. काही दिवसांनी त्या शाळा पडतील आणि या जागा बिल्डरांच्या घशात जातील. अर्थात, मराठी शाळा टिकविण्यासाठी सरकारी योजनेची आवश्‍यकता असून सरकारी मान्यता महत्त्वाची आहे. या कामाची सुरवात मध्यमवर्गीय समाजालाच करावी लागणार आहे. त्यामुळे, संमेलनाध्यक्षांनी या कामासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही प्रा. एलकुंचवार यांनी केल्या.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ‘मी मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिकलो आहे. सुदैवाने मला शिक्षण चांगले मिळाले. आज मात्र शिक्षण क्षेत्रातील वास्तव भयंकर आहे. प्राध्यापक पदासाठी भरावे लागणाऱ्या डोनेशनची रक्कम ऐकून छाती धडधडते. प्राध्यापक भरतीसाठी शासनाने एमपीएससी, यूपीएससी सारखी स्वायत्त संस्था उभारायला हवी. महाविद्यालये आणि शिक्षण व्यवस्था जोवर राजकीय नेत्यांच्या हाती राहील, तोवर हे होत राहील, असेही शोभणे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक अलोणी यांनी केले.

विचार आचरणात आणावेत - डॉ. अभय बंग

शिक्षण हे मराठीमध्ये असण्यापेक्षा मातृभाषेत असावे, म्हणून आपला आग्रह असायला हवा. शिक्षण मातृभाषेत नसल्याने मुलांचा नैसर्गिक विकास खुंटतो. शिक्षणाच्या या प्रश्‍नासाठी आपण आपल्यापासूनच सुरवात करायला हवी, असा सल्ला डॉ. अभय बंग यांनी दिला. पूर्वी, साहित्यिक आणि समाजसेवक या दोघांचे समाजात वजन होते. आज ते विस्थापित झाले. कारण, केवळ विचार असून चालत नाही. तर, त्या शब्दांचे आचरण देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. बंग म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com