
नागपूर : अत्याचार प्रकरणात पीडित वकील महिला आणि आरोपींमध्ये झालेल्या संबंधाला परस्पर संमती असल्यास तो अत्याचार ठरत नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, व्हॉट्सॲप चॅट्सवरून दोघांमधील संमती स्पष्ट झाल्याने आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीवर बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.