Nagpur Bench : 'परस्पर सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही'; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Bombay High Court Nagpur Bench Key Observation : नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले की, प्रौढ महिलेने परिणामांची जाणीव ठेवून सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्काराच्या कक्षेत येत नाहीत.
नागपूर : प्रौढ व समजदार महिलेने परिणामांची जाणीव ठेवून परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिला आहे.