Nagpur: आयोगाला कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नाही; उच्च न्यायालय, चिंतामण वंजारी यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग कारवाईचा आदेश रद्द
Nagpur High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंतामण वंजारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग कारवाईची शिफारस रद्द केली आहे. राज्य माहिती आयोगाच्या १० जानेवारी २०२० च्या आदेशाच्या विरोधात हा निर्णय घेतला गेला.
नागपूर : माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत तत्कालीन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग कारवाईची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.