नागपूर: भांडेवाडी परिसरातील गणेश ऊर्फ गुरुदेव बोरकर खूनप्रकरणात १६ दिवसांपासून फरार असलेल्या आणखी एका आरोपीला भांडेवाडी पोलिसांनी मौदा तालुक्यातून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. .अर्जुन प्रशांत पटले (वय २१, रा. बजरंग पार्क, जुनी कामठी, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी रात्री गणेश ऊर्फ गुरुदेव प्रितमलाल बोरकर (वय ४५) हे भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळील चहाच्या दुकानातून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले..Hunger Strike: उपोषण केल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात? १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपाशी राहण्याचे परिणाम.गंभीर जखमी झालेल्या गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची आई सुशिला प्रितमलाल बोरकर (वय ६२) यांनी भांडेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान मृताची पत्नी मनीषा गणेश ऊर्फ गुरुदेव बोरकर ऊर्फ मनीषा शांताराम पारधी (वय ३७) हिने पतीशी सुरू असलेल्या वादातून खुनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांना होता..FIFA World Cup Final 2026: अर्जेंटिना स्पेन महामुकाबला आज; भारतात फ्रीमध्ये कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?.मनीषा ही काही काळापासून मुलांना घेऊन शामनगर, पारडी येथे राहत होती. तिने यापूर्वी पतीला ‘तुझा मर्डर करणार तर मीच’ अशी धमकी दिल्याची माहितीही तपासात समोर आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.