Bhandewadi dumping yard in Nagpur, where concerns over waste disposal and environmental pollution have reached the High Court.
नागपूर, : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आतापासून जनजागृती करून अवैध होर्डिंगविरोधात कठोर कारवाई करावी आणि शहराचे विद्रूपीकरण रोखावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स पोस्ट’वर दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पुणे महापालिकेने अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंगविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचे कौतुक करत नागपुरातील प्रशासनानेही त्यातून बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.