
नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील मरु नदीच्या पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव वेगाने निघालेली एक हॅरियर ब्लॅक कार नियंत्रण सुटून 35 ते 40 फूट खाली नदीपात्रात कोसळली. या अपघातात कारचालक सागर वाघमारे (Sagar Waghmare) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेऊन स्वप्न पूर्ण करणाऱ्या सागरच्या आयुष्याचा प्रवास अकाली संपुष्टात आला.