
नागपूर शहरात एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पैशांच्या लालचाने तीन अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाचा किळसवाणा चेहरा उघड झाला आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत अब्दुल कादिर उर्फ कादिलबाबा याने आपल्या साथीदारांसह मध्यरात्री नग्नपूजेचा बनाव रचला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.