

Nagpur Fire
sakal
नागपूर : बिडगाव येथील वान्या धर्मकाटा समोरील डंपिंग यार्डजवळ सोमवारी सकाळी आठ गोदामांना भीषण आग लागून एक कोटी ३३ लाखांचे नुकसान झाले. सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.