

Nagpur News
esakal
नागपूर: अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, बालवयात झालेला जीवघेणा आजार आणि शिक्षणातील खंड या सर्व अडथळ्यांवर मात करत भूमी कोने या विद्यार्थिनीने लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातून बारावी आर्ट्समध्ये ७५ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, भूमी थिएटर आर्टिस्ट असून नाटकांच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती करते.