

Nagpur
esakal
नागपूर: बोलणे बंद केल्याच्या रागातून प्रेयसीला एमडी तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट प्रियकराने रचला. गुन्हेशाखेच्या पथकाने त्याला अटक केली. गोपाल किसन झोडगे (वय ३७, रा. परिश्रम कॉलनी, नरसाळा रोड, म्हाळगीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने प्रेयसीच्या मोपेडच्या फुटरेस्टखाली ८.९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ठेवली आणि पोलिसांना खोटी माहिती दिली.