Nagpur : कॅन्सरग्रस्तांना लगेच मिळाली औषधे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Cancer Patients

Nagpur : कॅन्सरग्रस्तांना लगेच मिळाली औषधे

नागपूर : आम्ही सकाळचे खुप आभारी आहोत साहेब. ‘सकाळ’ने आमच्या कॅन्सरग्रस्त नातेवाईकांची बाजू घेतली. आणखी किती दिवस औषध मिळाली नसते हे माहीत नाही. परंतु सकाळने मेडिकलमध्ये कॅन्सरग्रस्तांना मोफत औषध मिळत नसल्याचे वृत्त बुधवारी ठळकपणे प्रकाशित केले अन् तात्काळ आजच ९० टक्के औषध उपलब्ध झाले. आता दोन दिवसात अनेकांच्या केमोथेरपी होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा शब्दात गरीब रुग्णांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.

ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकल आहे. गरिबांच्या आरोग्याला मेडिकल हाच आधार आहे. यामुळे दरवर्षी साडेसात लाख रुग्ण येथे उपचारासाठी येतात. कॅन्सरच्या रुग्णांना मागील दीड महिन्यांपासून औषध उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने त्यांच्या केमोथेरपी थांबल्या होत्या. अनेकांनी जीवावर बेतणार असल्याची शंका व्यक्त केली. चक्क कॅन्सरग्रस्तांनी काढलेल्या मोर्चाच्या ‘सकाळ’च्या वृत्ताने बळ मिळाले. या वृत्ताची दखल मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी लगेच घेतली. मंत्रालयातही वृत्तामुळे खळबळ उडाली. वैद्यकीय आयुक्तालयातून कॅन्सरच्या रुग्णांना औषध का मिळत नाही, असा सवाल करीत अहवाल मागवला. ही बाब उजेडात येताच अधिष्ठात्यांना तत्काळ औषधांचे आदेश जारी केले. काही तासांत अनेक औषध उपलब्ध झाली. औषधी खरेदी करण्यात आल्याचा अहवाल मुंबईला आयुक्तालयात सादर करण्यात आला आहे.

कॅन्सरग्रस्तांना औषध उपलब्ध व्हावे यासाठी खरेदीच्या फाईलीवर सही केली होती. यापुढेही सातत्याने औषध उपलब्ध राहावे यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. गुरुवारी (ता.२५) सुमारे ११ प्रकारच्या औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल रुग्णालय, नागपूर

Web Title: Nagpur Cancer Patients Medicines Medical Treatment Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..