Nagpur News: नागपुरातील कळमना परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. कामठी रोडवरील या अपघातानंतर जखमी युवकाला मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर: भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.