Bus Strike : चालक संपावर; आपली बसला ‘ब्रेक’, दिवसभरात ५ हजार फेऱ्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप
Nagpur News : नागपुरात आपली बस चालकांनी वेतनवाढीसाठी संप पुकारला, त्यामुळे ५ हजार फेऱ्या रद्द झाल्या. संध्याकाळी वेतन खात्यात जमा होताच संप मागे घेण्यात आला.
नागपूर : शहर वाहतुकीचा कणा असलेल्या आपली बसच्या चालकांनी वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. त्यामुळे दिवसभर एकही बस रस्त्यावर धावली नाही. जवळपास ५ हजार फेऱ्या रद्द करावा लागल्या.