Nagpur : नागपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपता संपेना

मुंबईतील बैठकीसाठी अनेकांना निमंत्रणच नाही
Congress
Congress Sakal

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसनेही तयारी सुरू केली असून उद्या, शुक्रवार तसेच शनिवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु शहर काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीचे निमंत्रणच पोहोचले नसल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद कायम असल्याचे चित्र आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास भाजपसारख्या साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करणाऱ्या पक्षापुढे पक्ष कसा तग धरणार, असा प्रश्न काँग्रेसमधील अनेकांना पडला आहे.

प्रदेश काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी उद्या, शुक्रवारी तसेच शनिवारी, दोन दिवस मुंबईत बैठक बोलावली आहे.

शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपता संपेना

या बैठकीत प्रत्येक मतदार संघातील मागील निवडणुकीतील मते, सद्यस्थिती, विरोधी पक्षाची दुबळी बाजू आदींवर चर्चा होणार आहे.

Congress
Nagpur crime : सोने नवीन करण्याच्या बहाण्याने ओळखीतल्या महिलेनेच गंडविले; 71 तोळे सोने ठेवले गहाण

लोकसभा मतदार संघनिहाय नेत्यांना या बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. नागपुरातील नेत्यांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात आले. परंतु अनेक नेत्यांना शहर काँग्रेसकडून निमंत्रण मिळाले नसल्याचे सुत्राने नमुद केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी, अशोक धवड, डॉ. नितीन राऊत यांच्यासह तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे पाटील यांनाही निमंत्रण नसल्याचे समजते.

Congress
Nagpur : उपचारासाठी आलेला कैदी अन् पोलिसांची रंगली ओली पार्टी

नेत्यांची एकजूट नसल्याचे उघड

या सर्व नेत्यांचा समावेश माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांचे समर्थक नसलेल्यांमध्ये होतो. त्याचवेळी माजी केंद्रीयमंत्री मुत्तेमवार यांच्या समर्थकांना मुंबईतील बैठकीचे निमंत्रण मिळाल्याचे सुत्राने नमुद केले. पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कशी लढणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये एकजूट महत्त्वाची आहे. परंतु नेते एकत्र यायला तयार नसल्याचे मुंबईतील बैठकीच्या निमंत्रणावरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील काही नेते प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीवर आहेत. त्यांनाही निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com