नागपूर शहर दोन वर्षांनंतर 'कोरोनामुक्त'

जवळपास सव्वा दोन वर्षानंतर प्रथमच नागपूर शहरात सक्रिय कोरोनाचा रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले
corona free
corona freeesakal

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव देशातील इतर शहरात हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत असले तरी नागपूर शहर मात्र मागील दोन वर्षांनंतर पहिल्यांदा कोरोनामुक्त झाले. शहरात एक कोरोनाचा सक्रिय रुग्ण होता. शनिवारी सक्रिय कोरोनाबाधिताने कोरोनावर मात केली. यामुळे आता शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

मात्र ग्रामीण भागात एक आणि जिल्ह्याबाहेरच्या प्रत्येकी एका कोरोनाबाधितावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. शनिवारी ५५९ कोरोना चाचण्या झाल्या. यात शहरात एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. कोरोनाच्या तिन्ही लाटांनी हाहाकार माजविल्यानंतर कोरोनाचा प्रकोप पूर्णपणे थांबला.

जवळपास सव्वा दोन वर्षानंतर प्रथमच नागपूर शहरात सक्रिय कोरोनाचा रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. शहरात ना एक कोरोना बाधित राहिला आहे ना कोरोनाचा सक्रिय रुग्ण आहे. यामुळे प्रशासन समाधानी आहे.

कोरोनाचा पहिला शहरातील रुग्ण ११ मार्च २०२०

कोरोनाचा पहिला शहरातील मृत्यू ६ एप्रिल २०२०

सक्रिय कोरोनाचा एकही रुग्ण नाही २३ एप्रिल २०२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com