Nagpur News : नागपूर शहरात हुक्का पार्लर जोमात; तंबाखूजन्य फ्लेवरचा बेधडक वापर

नाइट क्लचरमधून नशेच्या आहारी जाणारी तरुणाई हुक्क्याच्या अधीन
nagpur city youth bend towards hookah addiction health affect job career education
nagpur city youth bend towards hookah addiction health affect job career educationesakal

Nagpur News : उपराजधानीत तरुणाई हुक्का पार्लरमध्ये धुराचे धडे गिरवत असून हुक्का पार्लर जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत. पॉश वस्त्यांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या पार्लरवर धडक कारवाई केल्यावरही बेधडकपणे हुक्क्याचा धुआ उडविण्यासाठी तरुणाई सरसावत असल्याचे दिसून येते.

पाश्‍चिमात्य संस्कृतीमध्ये तरुणाईमध्ये हुक्का सेवनाचे प्रमाण वाढले आहे. नाइट क्लचरमधून नशेच्या आहारी जाणारी तरुणाई हुक्क्याच्या अधीन जाते. त्याचा फायदा घेत, हुक्का पार्लरकडून हर्बल हुक्क्याच्या नावावर तंबाखूजन्य फ्लेवर देतात.

शहरातील धरमपेठ, सीताबर्डी, बजाजनगर, प्रतापनगर, सदर, जरीपटका आदी भागात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर सुरू आहेत. अनेकदा पोलिस ठाण्यातील पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्यांच्यावर छापा टाकून हुक्का पार्लरवर कारवाई केल्या जाते.

कारवाईतून मोठ्या प्रमाणात तबांखूजन्य फ्लेवर जप्तही केल्या जातात. असे असताना, कारवाईनंतर काहीच दिवसात पुन्हा या ठिकाणी हुक्का उपलब्ध होताना दिसून येतो. विशेष म्हणजे अनेकदा पोलिसांकडून एकाच हुक्का पार्लरवर अनेकदा कारवाई केल्यावरही तो काही दिवसात नव्या नावाने सुरू होताना दिसून येतो.

गुमास्त्यावर चालतात हुक्का पार्लर

शहातील बहुतांश हुक्का पार्लर महापालिकेच्या गुमास्त्यावर सुरू आहे. हुक्का पार्लर चालक महापालिकेकडून कॅफे वा रेस्टॉरेंट चालविण्यासाठी गुमास्ता घेतात. याशिवाय हर्बल हुक्क्याला मान्यता असल्याने त्याचा फायदा घेत, तबांखूजन्य विविध फ्लेवर वापरताना दिसून येतात. यावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई होताना दिसून येत नाही.

nagpur city youth bend towards hookah addiction health affect job career education
Nagpur News : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची ६० पैकी २० पदे रिक्त

महाविद्यालयीन विद्यार्थी टारगेट

हुक्का पार्लरमध्ये साधारणतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टारगेट केल् जाते. अनेकदा छाप्यानंतर कारवाईत विद्यार्थी या ठिकाणी आढळून येतात. पश्चिम नागपुरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांमध्ये शहरातील कानाकोपऱ्यातून व इतर जिल्ह्यातून शिक्षण घेण्यासाठी मुले-मुली येत असतात.

हा परिसर नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. याच परिसरात अलीकडच्या काळात हुक्का पार्लर सुरू झाली आहेत. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी या पार्लरमध्ये जातात आणि व्यसनाधीन होतात.

आरोग्य धोक्यात

विद्यार्थी-विद्यार्थिनी कॉलेज बुडवून हुक्का पार्लरमध्ये पार्टीला आवर्जून हजेरी लावतात. अनेक वेळा तर कॉलेजची ४० ते ५० मुले-मुली ग्रुपने हुक्का पिण्यासाठी येतात आणि पॉटवर पॉट पिऊन नशेत असतात.

सोळा ते अठरा वयाची युवक-युवती देखील या नशेत बुडून गेलेली असतात. मुलांना शारीरिक आजार देखील जडले आहेत. अनेक मुले संपूर्ण दिवसभर जेवण करत नाही. त्यामुळे अनेक मुले-मुली व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com