Nagpur News: अर्धा सिमेंट रस्ता, अर्धा डांबरी; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
Half Cement, Half Asphalt Road in Civil Lines: सिव्हिल लाइन्स भागातील रस्ता कामे सहा महिन्यांपासून संथपणे सुरू आहेत. अर्धा सिमेंट रस्ता, अर्धा डांबरी रस्ता असल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे.
नागपूर: सिव्हिल लाइन्स भागात गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही तो पूर्ण झाला नसल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.