
नागपूर - महाराष्ट्रात महाबळेश्वर हे साधारणपणे सर्वाधिक थंड शहर मानले जाते. मात्र बुधवारी नागपूरने थंडीच्या बाबतीत महाबळेश्वरलाही मागे टाकले आहे.
विदर्भात परतलेल्या थंडीच्या तीव्र लाटेमुळे गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल सात अंशांची घट होऊन, पारा १२ अंशांवर आला. तर महाबळेश्वरमध्ये १३.२ अंशांची नोंद करण्यात आली. विदर्भात कडाक्याच्या थंडीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे आगामी दिवसांत पारा आणखी खाली घसरण्याची दाट शक्यता आहे.