Yavatmal: विद्यार्थिनीनेच बनविला मैत्रिणींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ, नामांकित महाविद्यालयातील घटना

शहरातील एका शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील मैत्रीणींचा अंघोळ करीत असतानाचे व्हिडिओ बनविला. ही घटना मंगळवारी (ता.२७) उघडकीस येताच खळबळ उडाली.
Yavatmal Crime
Yavatmal Crime

Yavatmal Crime: शहरातील एका शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील मैत्रीणींचा अंघोळ करीत असतानाचे व्हिडिओ बनविला. ही घटना मंगळवारी (ता.२७) उघडकीस येताच खळबळ उडाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने १२ जणांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमली.

मैत्रिणीनेच आपला अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ बनविल्याची बाब विद्यार्थिनींच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही बाब प्राध्यापकांना सांगितली. त्यांनी विद्यार्थिनीचा मोबाईल व लॅपटॉप ताब्यात घेत वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान पालकांसह विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रमुखांकडे तक्रार केली. प्रमुखांनी तत्काळ १२ जणांचा समावेश असलेली एक चौकशी समिती नेमली. पालकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. (Latest Marathi News)

दिवसभर या समितीने व्हिडिओ व फोटोची पडताळणी केली. महाविद्यालयाची बदनामी होईल, या भीतीने वरिष्ठांनी चुप्पी साधण्यात धन्यता मानली. भयभीत झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुखांच्या कक्षाबाहेरच थांबले होते. या संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली त्यांनी प्रकरण गंभीर असल्याने १२ जणांची चौकशी समिती नेमण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Yavatmal Crime
Salary Hike: 2024मध्ये भारतीयांच्या पगारात किती होणार वाढ? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com