Nagpur Factory Blast : उद्याची स्वप्ने स्फोटाने केली उद्ध्वस्त! नाईट शिफ्टवरून परतताच पत्नी गेल्याची बातमी मिळाली अन्...

What Happened in the Nagpur Company Explosion? राऊळगाव, नागपूर येथे कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ३० वर्षीय महिला कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंब उद्ध्वस्त झाले असून औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Nagpur Company Explosion in Roulgaon

Nagpur Company Explosion in Roulgaon

esakal

Updated on

-अखिलेश गणवीर

राऊळगाव (जि. नागपूर) : रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतलो. थकलेले शरीर आणि डोळ्यांत झोप (Nagpur company explosion latest news) होती. एवढ्यात अचानक स्फोट झाल्याची बातमी कानावर आली. ज्या कंपनीत मी काम करतो, त्याच ठिकाणी हा स्फोट झाला होता. क्षणाचाही विलंब न लावता कंपनीकडे धाव घेतली. मात्र तिथे मिळालेली बातमी आयुष्याला कायमचा घाव देणारी ठरली, अशी भावना नीळकंठ यशकर यांनी व्यक्त केली. या स्फोटात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Shaista Tadvi success story Jalgaon
Woman Assault Case
Nagpur News
Nagpur Factory Blast
Marathi News Esakal
www.esakal.com