Ashok Chavan BJP: कोण जाणार, कोण थांबणार? नागपूर काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, फडणवीसांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे संशय

माजी मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील कोण आमदार व नेते जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ashok Chavan BJP: कोण जाणार, कोण थांबणार? नागपूर काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, फडणवीसांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे संशय

Nagpur Congress Ashok Chavhan BJP Joining: माजी मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील कोण आमदार व नेते जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप कोणीही यास होकार दिला नसला तरी यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून एकमेकांकडे संशयाने बघितल्या जात आहे.

अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांचा गट त्यांच्यासोबत होता. चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जायचे. चव्हाण यांनी मुत्तेमवार-ठाकरे गटाला महापालिकेच्या निवडणुकीत झुकते माप दिले होते.

दीडशेपैकी सुमारे शंभर जागा त्यांच्या समर्थकांना दिल्या होत्या. त्यामुळे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व माजी मंत्री नितीन राऊत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. काही कार्यकर्त्यांनी याचा राग चव्हाण यांच्यावर शाई फेकून काढला होता. याच कारणामुळे पुढे चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यात आमदार विकास ठाकरे यांचाही समावेश होता. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने सध्या शहरातील समीकरण बदलले आहे. मुत्तेमवार विरोधक प्रमुख नेते एकत्र आले आहेत. मुत्तेमवार-राऊत-चतुर्वेदी सार्वजनिक कार्यक्रमांना जोडीनेच सहभागी होत आहेत.

Ashok Chavan BJP: कोण जाणार, कोण थांबणार? नागपूर काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, फडणवीसांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे संशय
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीचे आहेत अनेक फायदे; मुलीच्या जन्मानंतर तात्काळ करा सुरु

फडणवीसांंसोबत मैत्रीपूर्ण संबंधांमुळे संशय

विकास ठाकरे आणि नाना पटोले यांचे आता सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते जातील असे सध्या कोणालाच वाटत नाही. त्यांनीसुद्धा यास नकार दिला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांच्याकडे नेहमीच संशयाने बघितले जाते. (Latest Marathi News)

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा ते भाजपचे उमेदवार राहतील अशी जोरदार चर्चा होती. भाजपनेसुद्धा त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केला नव्हता. अशा प्रकारे ठाकरेंच्या मदतीसाठी भाजपने प्रयत्न केल्याची चर्चा आजही नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे.

उत्तर नागपूर राखीव मतदारसंघ असल्याने नितीन राऊत यांच्या अनेक अडचणी आहेत. सावनेरचे माजी आमदार सुनील केदार यांचा विषय कोर्टकचेऱ्यांमुळे संपला आहे. उमरेडचे आमदार राजू पारवे भाजपात जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अशोक चव्हाण यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश असल्याचा दावा त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करीत आहेत.

Ashok Chavan BJP: कोण जाणार, कोण थांबणार? नागपूर काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, फडणवीसांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे संशय
Ashok Chavan: घाईघाईत घेतली 'एनओसी'! अशोक चव्हाणांची सुरू झाली राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com