नागपूर : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Congress Protest

नागपूर : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : वाढती महागाई, अन्नधान्यावर आकारण्यात आलेला जीएसटी आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी शहर काँग्रसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांना अटक केली आहे.

काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि घोषणाबाजी सुरू केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत द्यावे, कर्ज माफी करावी अशा घोषणाही देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हातात झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक झळकावले. पोलिस बंदोबस्त असताना कार्यकर्ते बॅरीकेड्‍स तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यामुळे पोलिसांनी आमदार विकास ठाकरे, आशिष दीक्षित, बंटी शेळके, इरफान काजी, सागर चव्हाण,नयन तरवटकर, पिंटू तिवारी, विष्णू वर्मा यांच्यासह चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाधिकारी समोरच्या रोडवर आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

आंदोलनामध्ये विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर,गिरीश पांडव, कमलेश समर्थ,संदेश सिंगलकर, डॉ. गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, नैश अली, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, रजत देशमुख, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रवीण गवरे, डॉ. प्रकाश ढगे, पुरुषोत्तम गौरकर, सुनील पाटील, पंकज निघोट, रिचा जैन,अशोक निखाडे, मामा राऊत, डॉ. कोंबाडे, पुरुषोत्तम हजारे, योगेश कुंचलवार, रमन पैगवार, प्रशांत धाकणे, प्रशात धवड, ईरशाद मलिक, सुनीता ढोले, सूरज आवळे, संदीप सहारे, मनोज सांगोळे, परमेश्वर राऊत, पिंटू बागडी,सरफराज खान सहभागी झाले होते.

Web Title: Nagpur Congress Protest Against Inflation Mla Vikas Thackeray Bunty Shelke Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..