
World No Tabacco Day 2025: गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होतो. शासनाने गुटखा आणि गुटख्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली. मात्र, दुष्परिणाम माहिती असूनही अनेकजण तंबाखू, गुटखा खातात. सिगारेटची ओढतात. विशेष म्हणजे तंबाखूमुळे महिन्याकाठी जिल्ह्यात सुमारे २८ कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. जिल्ह्यात आंध्र प्रदेश आणि वेलूरहून तंबाखूचा पुरवठा होतो.