नागपूर : लक्षणे नसलेले बाधित वाऱ्यावर; कुटुंबीयांची धाकधूक वाढली

दोन्ही डोस घेतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरीच विलगीकरणाबाबत आयुक्तांनी आदेश काढले.
Corona Patient
Corona PatientSakal

नागपूर : शहरात बाधितांचा आकडा शेकडोनी (Corona Patient) वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यातच लक्षणे नसलेले तसेच दोन्ही डोस घेतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरीच विलगीकरणाबाबत आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे आमदार निवासात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांना घरी पाठविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. विशेष म्हणजे ज्यांची घरे छोटी आहेत अशांच्या कुटुंबीयांतही भीती वाढली आहे. (Nagpur Corona Updates)

गेल्या तीन दिवसांत शेकडोंच्या संख्येत बाधितांची भर पडत आहे. सर्वाधिक बाधित लक्ष्मीनगर, धरमपेठ व आशीनगर झोनमध्ये आढळून येत आहे. परंतु, संपूर्ण शहरातच पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. अनेकजण कुटुंबातील सदस्य बाधित आढळल्यास संस्थात्मक विलगीकरणाचा विचार करीत आहेत.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याबाबत आदेश काढले. यात त्यांनी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येईल, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Corona Patient
‘वीर गाथा’ राष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील आरिव चौथ्या क्रमांकावर

सध्या आमदार निवासात संस्थात्मक विलगीकरणात बाधितांना ठेवण्यात आले आहे. आमदार निवासातील एका विंगमध्ये तूर्तास दीडशे बेडची सोय उपलब्ध आहे. येथे जवळपास शंभरावर बाधित होते. परंतु ,आजच्या स्थितीत चाळीसपेक्षा कमी बाधित आहेत. आयुक्तांच्या आदेशामुळे लक्षणे नसलेल्या बाधितांना घरी जाण्यास सांगण्यात आले. परिणामी यातील बरेच जण घरे परतले. त्यामुळे कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण आहे. अनेकांकडे केवळ दोनच रूम असल्याने बाधित सदस्याला घरात ठेवण्यास घरचेच टाळाटाळ करीत आहे तर प्रशासन संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यास तयार नाही. अशा बाधितांनी कुठे जावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्गदर्शक तत्त्वाचीही पायमल्ली

पाच जानेवारीला केंद्र सरकारने गृह विलगीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यात वेगळी खोली, प्रसाधनगृह असेल तरच गृह विलगीकरणात राहावे अथवा संस्थातमक विलगीकरणाचा अवलंब करावा. परंतु, या मार्गदर्शक तत्त्वाचीही पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.

Corona Patient
टीईटी परिक्षेसाठी परीक्षार्थींकडून चार कोटी रुपये घेणारे दोघे अटकेत

गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे

  • घरी खेळती हवा असलेली वेगळी खोली आवश्यक

  • ७२ तासानंतर मास्क तुकडे करून कागदाच्या बॅगेत भरावे

  • हात स्वच्छ धुवावे

  • बाधितांची काळजी घेणारी व्यक्ती दोन्ही डोस घेतलेली असावी

  • काळजी घेणाऱ्या व्यक्तीने चेहरा किंवा तोंडाला हात लावणे टाळावे

  • सात दिवसानंतर रुग्णाला बाहेर वावरता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com