देशातील पहिले विधी महाविद्यालय कंत्राटी प्राध्यापकांच्या भरवशावर

नागपूर विद्यापीठ उदासीन : खासगीच्या पालनपोषणासाठी खटपट?
Nagpur law college
Nagpur law college sakal

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा देशातील पहिल्या दहामध्ये समावेश आहे. कित्येक दिग्गज नेते आणि विधिज्ञ या महाविद्यालयाने घडविले आहेत. अशा या नामवंत विद्यालयाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दुर्लक्ष करीत असल्याने महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापक नेमण्याची वेळ आली आहे.

पुढाऱ्यांच्या खासगी विधी महाविद्यालयांच्या पालनपोषणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा बळी दिला जात असल्याची चर्चा आहे. या महाविद्यालयात अत्याधुनिक क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, नियमित प्राध्यापक, आणि सुसज्ज इमारतसुद्धा नाही. इमारत जुनी झाली आहे. २०२५ साली या महाविद्यालयाला शंभर वर्षे होणार आहेत.१९२५ साली ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ’ची स्थापना करण्यात आली. भारतात स्थापन झालेले १० वे एकमेव लॉ कॉलेज होते.

तेव्हा नागपूर ही मध्य प्रांताची (सी.पी.ॲण्ड बेरार) राजधानी होती. १९६१ मध्ये राज्य पुनर्रचनेद्वारे नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला. सुरुवातीपासूनच अमरावती मार्गावरील इमारतीमध्ये वर्ग सुरू करण्यात आले. याशिवाय तीन वर्षीय विद्यार्थ्यांचे वर्ग गीता मंदिरामध्ये भरायचे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उमरेड मार्गावर स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली. महाविद्यालयात नियमित प्राध्यापकांची संख्या जेमतेम आहे. त्यामुळे कंत्राटी प्राध्यापक नेमण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना घडविले

माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, रूमा पॉल यांच्यासह उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालयातील अनेक न्यायाधीश आणि वकिलांना या महाविद्यालयाने घडविले आहे.

माजी विद्यार्थ्यांनी घ्यावा पुढाकार

विधी महाविद्यालयातून शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर आहेत. अनेकांनी राजकारणात उंची गाठली आहे. याशिवाय अनेकांनी विधिज्ज्ञ म्हणून नाव कमावले आहे. त्यांनी एलआयटीच्या माजी विद्यार्थी संघटनेप्रमाणे समोर येऊन एलआयटीप्रमाणे विधी महाविद्यालयाच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.

महाविद्यालयातील ग्रंथालय वा विविध साधन सुविधांसाठी प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाकडे दिले आहेत. त्यावर विद्यापीठ प्रशासन निर्णय घेईल.

- डॉ. प्रविणा खोब्रागडे, कार्यकारी प्राचार्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com