
नागपूर : नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. संपूर्ण शहर झोपी गेले असताना न्यायालयात दोन पक्ष बाजू मांडत होते.