
नागपूर : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकासह त्याला सहकार्य करणाऱ्या विवाहित महिलेला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (विशेष न्यायालय) वीस वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे. साहिल भीमराव नेहारे (वय २१) असे अत्याचार करणाऱ्या आणि वर्षा अमित भोंडवे (वय २७) असे त्याला सहकार्य करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दोघांना पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली.