Nagpur Crime: मनोरुग्ण मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला २० वर्षांची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय

काटोल येथे मनोरुग्ण मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली.
Nagpur Crime: मनोरुग्ण मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला २० वर्षांची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Physical Assault on Specially abled Girl: काटोल येथे मनोरुग्ण मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, एकूण सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.

राहुल ऊर्फ पिंटू भीमराव लांबघरे (२५) असे आरोपीचे नाव असून तो येरला धोटे येथील रहिवासी आहे. व्यवसायाने मजूर असलेल्या लांबघरेने २३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध ९ साक्षीदार तपासले. तसेच, इतर विविध पुराव्यांच्या आधारावर संबंधित गुन्हे सिद्ध केले. (Latest Marathi News)

अशी आहे पूर्ण शिक्षा
भादंवि कलम ३७६ (२)(१) (बलात्कार): २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास. कलम ४५२ (घरात बळजबरीने प्रवेश) : दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.

Nagpur Crime: मनोरुग्ण मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला २० वर्षांची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय
Food Poisoning in Buldhana: धक्कादायक! बुलढाण्यात महाप्रसादातून ५०० हून अधिक जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु, काहींची प्रकृती चिंताजनक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com