नागपूर : उधारीचे पैसे न देता, वाद घालून २२ वर्षीय युवकाने अपार्टमेंटमध्ये असलेले चक्क चहाचे दुकान जाळले. ही धक्कादायक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर परिसरात असलेल्या व्यंकटेश एनक्लेव्हमध्ये बुधवारी (ता.२३) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने अपार्टमेंटमधे राहणाऱ्या नागरिकांचाही जीव धोक्यात आला होता हे विशेष. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.